Pune Mahanagarpalika Bharti 2026 : पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील घनकचरा व्यवस्थापन विभाग कार्यालय अंतर्गत विविध पदांसाठी ११ महिन्यासाठी तात्पुरत्या कालावधीसाठी संबंधित पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 60 जागांची भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती मध्ये 10वी उत्तीर्ण व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे, अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
| Post Date : 02 July 2026 | Last Date : १३ July 2026 |
Pune Mahanagarpalika Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
भरती विभाग : पुणे महानगरपालिका (Pune Mahanagarpalika)
एकूण पदसंख्या : 60 जागा
पदांचे नाव : कनिष्ठ अभियंता, आरोग्य निरीक्षक
शैक्षणिक पात्रता :
- कनिष्ठ अभियंता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची बी.टेक पदवी /बी.ई. पदवी इन एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग एन्ड टेक्नॉलॉजी
- आरोग्य निरीक्षक : i) एच.एस.सी. उत्तीर्ण ii) स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण iii) शास्त्र शाखेच्या पदवीधारकास प्राधान्य.
Pune Mahanagarpalika Bharti 2026 Links
| ऑफलाईन अर्ज व जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : अर्ज शुल्क जाहिरात मध्ये नमूद नाही.
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 40,000/- रुपये ते 50,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : पुणे, महाराष्ट्र
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : स्वच्छ सर्वेक्षण वॉर रूम, पुणे मनपा मुख्य इमारत, पहिला मजला, शिवाजीनगर पुणे ४११००५.
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : १३ जुलै २०२६
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
- वरील पदांसाठी उप आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन, पुणे महानगरपालिका यांचे नावे अर्ज करावा. अर्जामध्ये उमेदवाराने संपूर्ण नाव, पत्ता, जन्मदिनांक, वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, दूरध्वनी क्र.,मोबाईल नं. इ. बाबी नमूद करणे आवश्यक आहे. अर्जासोबत शैक्षणिक पात्रता दाखल्यांच्या प्रमाणित केलेल्या सत्यप्रती जोडणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराने अर्जावर स्वतःचा एक पासपोर्ट साईज फोटो चिकटवावा.
- तसेच उमेदवाराने अर्जावर स्वतःचा एक पासपोर्ट साईज फोटो चिकटवावा.
- वरील पदावरील नेमणुका दरमहा एकवट वेतनावर, करार पद्धतीने व ११ महिने तात्पुरत्या कालावधीसाठी केल्या जातील.
- उमेदवारांना मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल.
- उपरोक्त पदांसाठी अर्ज करण्याचा कालावधी दिनांक २९/०६/२०२६ ते १३/०७/२०२६ दुपारी ३.०० वाजेपर्यंत राहील. यानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. सदरील अर्ज स्वच्छ सर्वेक्षण वॉर रूम, पुणे मनपा मुख्य इमारत, पहिला मजला, शिवाजीनगर पुणे ४११००५ येथे कार्यालयीन वेळेत (सार्वजनिक सुट्ट्यांचा कालावधी वगळून) स्वीकारण्यात येतील.
- सदर नियुक्त्या करार पद्धतीने होणार असल्याने निवड झालेल्या उमेदवारांना म.न.पा. च्या आस्थापनेवरील कोणत्याही पदावर नियुक्तीकरिता हक्क सांगता येणार नाही. तसेच म.न.पा. कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेले कोणतेही लाभ मिळण्यास ते पात्र ठरणार नाहीत.
- सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
- सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
- अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक १३ जुलै 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
- अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
हे पण वाचा :
- 💡 पदवीधरांना सुवर्णसंधी ! TIFR मुंबईत मोठी भरती; थेट वॉक-इन सिलेक्शन, पहा सविस्तर ! TIFR Mumbai Bharti 2026
- सुवर्णसंधी! सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत 444 पदांची भरती; जाणून घ्या निवड प्रक्रिया, Sangli DCC Bank Bharti 2026
- संधी सोडू नका ! SSC CGL Bharti 2026 ! शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण ! आजचं येथे अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा











