CRPF Sports Quota Bharti 2026 : केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) देशसेवा करण्याची इच्छा असलेल्या तरुण खेळाडूंसाठी एक मोठी खुशखबर समोर आली आहे. CRPF Sports Quota Bharti 2026 अंतर्गत हेड कॉन्स्टेबल (GD) आणि कॉन्स्टेबल (GD) पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.
या भरती प्रक्रियेची माहिती समोर आल्यापासूनच अनेक खेळाडू याच्या शोधात होते. या लेखामध्ये आपण या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, उपलब्ध जागा, वेतन आणि अर्ज करण्याची संपूर्ण पद्धत अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही.
CRPF Sports Quota Bharti 2026 : केंद्रीय राखीव पोलीस दल भरती 2026
| Post Date : 23 सप्टेंबर 2026 | Last Date : 11 नोव्हेंबर 2026 |
CRPF Sports Quota Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन
भरती विभाग : केंद्रीय राखीव पोलीस दल
एकूण पदसंख्या : 521 रिक्त जागा
पदांचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) – स्पोर्ट्स कोटा | १८२ |
| 2 | कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) – स्पोर्ट्स कोटा | 339 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1 : 12वी उत्तीर्ण
- पद क्र.2 : 10 वी उत्तीर्ण
क्रीडा पात्रता : मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले; राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा किंवा चॅम्पियनशिपमध्ये राज्य/केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व करून तिसऱ्या स्थानापर्यंतचे पदक किंवा स्थान मिळवलेले; आंतर-विद्यापीठीय वैयक्तिक स्पर्धांमध्ये प्रथम किंवा द्वितीय स्थान मिळवलेले किंवा सांघिक स्पर्धेत अंतिम फेरी गाठलेले; अथवा कनिष्ठ (ज्युनियर) राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सुवर्ण किंवा रौप्य पदक जिंकलेले उमेदवार.
CRPF Sports Quota Bharti 2026 Links
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 ऑगस्ट 2026 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 23 वर्षापर्यंत असावे. (UR : 05 वर्षे सूट, SC/ST : 10 वर्षे सूट, OBC : 08 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : GEN/OBC/EWS : ₹100/-रु. (SC/ST/ExSM/महिला: फी नाही)
मासिक वेतन : सदर भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना 81,100/- रुपये इतके आकर्षक मासिक वेतन वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 11 नोव्हेंबर 2026
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
अर्ज कसा आणि कुठे करावा?
- सर्वप्रथम सीआरपीएफच्या CRPF Recruitment Website या अधिकृत पोर्टलला भेट द्या.
- १२ ऑक्टोबर २०२६ रोजी अर्ज लिंक सक्रिय झाल्यावर नोंदणी (Registration) करा.
- आपली वैयक्तिक माहिती, शैक्षणिक कागदपत्रे आणि क्रीडा प्रमाणपत्रे अचूक अपलोड करा.
- आवश्यक अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट आउट काढून ठेवा.
हे पण वाचा :
- 🛑 मोठी भरती ! भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) अंतर्गत तब्बल 4098 जागांची भरती सुरु ! अर्ज कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण माहिती
- IOB LBO Bharti 2026: इंडियन ओव्हरसीज बँकेत लोकल बँक ऑफिसर पदांची मोठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.







