Anganwadi Bharti 2024 : एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) नाशिक शहर बाल विकास प्रकल्प अधिकारी नाशिक जिल्हा यांच्या अधिनस्त म्हणून अंगणवाडी मदतनीस म्हणून रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 03 रिक्त पदे भरली जाणार असून 12 वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार आहे. या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती जसे पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण,महत्वाच्या तारखा अशा विविध बाबींचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे.या भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने करावयाचे असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरती साठी फॉर्म करण्याची अंतिम दिनांक हि 10 ऑगस्ट 2024 आहे.
Anganwadi Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (offline)
एकूण पदसंख्या : 03 रिक्त पदे
भरती विभाग : बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी)
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव व अंगणवाडी केद्र | एकूण पदसंख्या |
01 | अंगणवाडी मदतनीस (देवळाली गाव ) | 01 |
02 | अंगणवाडी मदतनीस (कळवण रामनगर ) | 01 |
03 | अंगणवाडी मदतनीस (इगतपुरी-जोगेश्वरी ) | 01 |
शैक्षणिक पात्रता : अंगणवाडी मदतनीस पदांसाठी इयत्ता 12 वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष) अशी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष पूर्ण व कमाल वय वर्ष 35 असावे. तसेच विधवा उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्ष राहील.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : शासकीय नियमानुसार वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत :
निवड प्रक्रिया : मेरीट लिस्ट नुसार निवड प्रक्रिया
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जि.नाशिक यांचे कार्यालय सिल्वरमून FLATNO.01 ड्रीमसिटीजवळ सहकार नगर रामदासस्वामी मार्ग नाशिक-४२२००६
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 10 ऑगस्ट 2024
Anganwadi Bharti 2024 Links
संपूर्ण जाहिरात व अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती प्रक्रिया उपरोक्त शासन निणर्य दिनांक 02.02.2023 अन्वये राबविण्यात येणार असून निवड व नियुक्ती गुणवत्ता यादीनुसार करण्यात येणार आहे. करिता उमेदवारांनी कोणत्याही भूलथापाना अथवा अफवांना बळी पडू नये.
- भरती प्रक्रीयेसंबंधी अर्जादारस कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. सर्व सूचना जाहिरातीमधील अटी व शर्ती प्रमाणे असून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल.
- अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच दिलेल्या वेळेत पोचतील अशा पद्धतीने पाठवावे.
हे आपल्या मित्रांना पाठवा !