District Central Co-Operative Bank Bharti 2024 : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत सरळसेवा पद्धतीने भरती सुरु ! त्वरित आवेदन करा

District Central Co-Operative Bank Bharti 2024 : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अंतर्गत विविध श्रेणीतील रिक्त 179 पदे सरळसेवा भरतीद्वारे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती जसे पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण, महत्वाच्या तारखा अशा विविध बाबींचा तपशील खाली सविस्तर उपलब्ध करून देण्यात आला आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी,तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक सविस्तर उपलब्ध करून दिली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 09 ऑगस्ट 2024 आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

District Central Co-Operative Bank Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 179 रिक्त पदे 

भरती विभाग : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी 

भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात नोकरीची मोठी संधी 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01व्यवस्थापक 03
02उपव्यवस्थापक 06
03लिपिक 0131
04शिपाई 039

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा आणि 03 वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अधिकारी पदाचा अनुभव आणि उमेदवार एम.एस.सी.आय.टी. किवा शासन मान्यताप्राप्त संस्थेचे किमान 90 दिवसांचे तत्सम संगणक प्रमाणपत्र प्राप्त असावा.
  • पद क्र.02 : उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा आणि 02 वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अधिकारी पदाचा अनुभव आणि उमेदवार एम.एस.सी.आय.टी. किवा शासन मान्यताप्राप्त संस्थेचे किमान 90 दिवसांचे तत्सम संगणक प्रमाणपत्र प्राप्त असावा.
  • पद क्र. 03 : उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा आणि उमेदवार एम.एस.सी.आय.टी. किवा शासन मान्यताप्राप्त संस्थेचे किमान 90 दिवसांचे तत्सम संगणक प्रमाणपत्र प्राप्त असावा.
  • पद क्र. 04 : उमेदवार 10 वी पास असावा 

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 40 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : या भरतीचा अर्ज शुल्क हे 1000/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवाराला 43,204/- रुपये वेतन दिलेलं जाईल.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल नंतर कागदपत्र पडताळणी व मुलाखत घेण्यात येईल.

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी 

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 01 ऑगस्ट 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 09 ऑगस्ट 2024

District Central Co-Operative Bank Bharti 2024 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • परीक्षा शुल्क संकेत स्थळावर अद्यावत केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
  • उमेदवारांना परीक्षा शुल्काची रक्कम रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी बँकेच्या कोणत्याही शाखेमध्ये रोखीने भरणा करता येईल.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना स्वतः चा ईमेल आयडी मोबाईल क्रमाक व आधार कार्ड क्रमांक अचूक भरणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराने अर्ज भरताना ज्या पदांसाठी तो अर्ज करीत आहे त्या पदांसाठी आवश्यक असणारी पात्रता धारण करित असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा. अपात्र अर्जासोबत कोणत्याही पत्रव्यवहार करण्यात येणार नाही.
  • सदर भरती प्रक्रीये दरम्यान बँकेच्या संकेत स्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेच्या अद्यावत माहितीचे अवलोकन करण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील.
  • विविध श्रेणीतील पदांच्या सरळसेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज विहिती नमुन्यात सादर करण्यासाठीची पात्रता निकष व वरील जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.

🔴 हे पण वाचा : हिंदुस्थान कॉपर लिमिटेड अंतर्गत नविन पदांसाठी भरती ! पात्रता – 10 वी उत्तीर्ण ! येथे आवेदन करा !


हे आपल्या मित्रांना पाठवा !

error: Content is protected !!