NMMC Recruitment 2024 : नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत 15 व्या वित्त आयोगाअंतर्गत रिक्त असलेल्या पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये 12 वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट व अर्ज करण्यासाठी ऑफलाईन अर्जाचा नमुना उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 05 ऑगस्ट 2024 पर्यंत दिली आहे.
NMMC Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 059 रिक्त पदे
भरती विभाग : नवी मुंबई महानगरपालिका
भरती श्रेणी : एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | बहुउद्देशीय कर्मचारी | 059 |
शैक्षणिक पात्रता : 12 वी विज्ञान शाखेत पास + पॅरामेडिकल मुलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम किवा स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम + संगणक प्रशिक्षण
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे खुला प्रवर्ग-38 वर्ष ते राखीव प्रवर्ग – 43 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000/- रुपये प्रती महिना वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत
निवड प्रक्रिया : गुणांकन पद्धतीनुसार मेरीट लावण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण : नवी मुंबई (jobs in navi mumbai)
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य अधिकारी,आरोग्य विभाग 3 रा मजला नमूंमपा मुख्यालय प्लॉट नं. 1,से,15 किल्लेगावठाण जवळ, सी.बी.डी.बेलापूर,नवी मुंबई 400614
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 05 ऑगस्ट 2024
NMMC Recruitment 2024 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- उपरोक्त पदे हि कंत्राटी स्वरुपाची असून नियुक्ती 6 महिन्याच्या कालावधी करिता राहील.
- सर्व उमेदवारांनी जाहिरात मध्ये नमूद अर्जा मध्ये अर्ज विहिती कालावधीत भरणे आवश्यक आहे.
- अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्याची माहिती अचूक भरावी. एकदा भरलेली माहिती अंतिम समजण्यात येईल व त्यात कोणताही बदल करता येणार नाही याची न नोंद घ्यावी.
- अर्ज भरत असताना अंतिम वर्षाच्या मिळालेले गुण व गुणांची टक्केवारी अचूकपणे नमूद करावी. ग्रेड अथवा अन्य श्रेणी नमूद न करता गुण व गुणांची टक्केवारी नमूद करणे अनिवार्य आहे.प्रमाणपत्रात नमूद गुण व गुणांची टक्केवारी अर्जात नमूद टक्केवारी न जुळल्यास असे अर्ज नामंजूर करण्यात येईल.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.
🔴 हे पण वाचा : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत “सल्लागार” पदांसाठी भरती ! सरकारी विभागात नोकरीची संधी ! येथे आवेदन करा !
हे आपल्या मित्रांना पाठवा !