BHEL Artisan Bharti 2026 : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये बंपर भरती! १० वी आणि आयटीआय धारकांसाठी उत्तम संधी

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
BHEL Artisan Bharti 2026

BHEL Artisan Bharti 2026 : सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य महावरत्न कंपनीमध्ये सरकारी नोकरी मिळवून आपले भविष्य उज्ज्वल करू इच्छिणाऱ्या तरुण आयटीआय (ITI) धारकांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. BHEL Artisan Bharti 2026 अंतर्गत भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने (BHEL) विविध युनिट्समधील तांत्रिक कामांसाठी अधिकृत भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील कुशल उमेदवारांसाठी ही अत्यंत महत्त्वाची रोजगार संधी मानली जात आहे. या लेखामध्ये आम्ही तुम्हाला BHEL Artisan Bharti 2026 ची संपूर्ण आणि सविस्तर माहिती अत्यंत सोप्या मराठी भाषेत देणार आहोत. यामध्ये उपलब्ध असलेल्या रिक्त जागा, आवश्यक तांत्रिक व शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड पद्धत आणि ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा सादर करावा, याबद्दल सविस्तर तपशील मिळेल जेणेकरून तुम्हाला अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही.

BHEL Artisan Bharti 2026 : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड भरती 2026

Post Date : 19 ऑक्टोंबर 2026Last Date : 18 नोव्हेंबर 2026

www.marathigurumahajobs.in

BHEL Artisan Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन

भरती विभाग : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड

एकूण पदसंख्या : 660 रिक्त जागा

पदांचे नाव : आर्टिजन

शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह ITI/NAC (वेल्डर / टर्नर / मशीनिस्ट / इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिक / फाउंड्रीमॅन) (SC/ST: 55% गुण)

BHEL Artisan Bharti 2026 Links

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 ऑक्टोबर 2026 रोजी कमाल 18 वर्ष ते किमान 27 वर्षापर्यंत असावे. [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : GEN/OBC/EWS: ₹1072/- (SC/ST/PWD/ExSM: ₹472/-)

मासिक वेतन : सदर भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना 29,500/- रुपये इतके आकर्षक मासिक वेतन वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश येथील BHEL युनिट्स.

ऑनलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 18 नोव्हेंबर 2026

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

अर्ज कसा आणि कुठे करावा?

  • सर्वप्रथम भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या अधिकृत BHEL Careers Website या संकेतस्थळाला भेट द्या.
  • मुख्य पानावर उपलब्ध असलेल्या ‘Current Job Openings’ मधील ‘Artisan Recruitment 2026’ ची लिंक निवडा.
  • ‘New Registration’ वर क्लिक करून आपली वैयक्तिक माहिती, ईमेल आयडी प्रविष्ट करून नोंदणी पूर्ण करा.
  • लॉग-इन करून अर्जातील शैक्षणिक गुण आणि आयटीआय ट्रेड अचूक प्रविष्ट करा. तुमचे आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करा.
  • उपलब्ध असलेल्या गेटवेद्वारे ऑनलाईन अर्ज शुल्क (लागू असल्यास) भरा आणि अंतिम फॉर्म सबमिट करून त्याची प्रिंट आउट काढून ठेवा.

हे पण वाचा :

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

Leave a Comment