Indian Army TGC Bharti 2026 : भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून देशसेवा करण्याची इच्छा असलेल्या युवा इंजिनिअर्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. Indian Army TGC Bharti 2026 अंतर्गत १४५ व्या टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्सची अधिकृत संक्षिप्त अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही देशसेवेचे स्वप्न पाहणारे हजारो तरुण या भरती प्रक्रियेची आतुरतेने वाट पाहत होते, कारण याद्वारे भारतीय सैन्यात थेट लेफ्टनंट पदावर नोकरी मिळवता येते.
या लेखात आम्ही तुम्हाला या नवीन भरती प्रक्रियेविषयी संपूर्ण माहिती देणार आहोत. यामध्ये अर्ज करण्याची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि निवड पद्धती कशी असेल, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले आहे. जर तुम्ही इंजिनिअरिंग पूर्ण केले असेल किंवा अंतिम वर्षात असाल, तर हा लेख तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.
Indian Army TGC Bharti 2026 : भारतीय सैन्य टेक्निकल पदवीधर भरती 2026
| Post Date : 01 ऑक्टोंबर 2026 | Last Date : 29 ऑक्टोंबर 2026 |
Indian Army TGC Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन
भरती विभाग : भारतीय सैन्य टेक्निकल पदवीधर कोर्स-जुलै 2027
एकूण पदसंख्या : 30 रिक्त जागा
पदांचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | TGC | 30 |
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.
Indian Army TGC Bharti 2026 Links
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 जुलै 2027 रोजी किमान 20 वर्ष 27 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.
मासिक वेतन : सदर भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना 56,100/- रुपये इतके आकर्षक मासिक वेतन वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 29 ऑक्टोबर 2026
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
अर्ज कसा आणि कुठे करावा?
इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम भारतीय सैन्याच्या Join Indian Army या अधिकृत पोर्टलला भेट द्यावी. तिथे ‘अधिकारी प्रवेश’ (Officer Entry Apply/Login) या पर्यायावर क्लिक करून स्वतःची नोंदणी पूर्ण करावी.
नोंदणी झाल्यानंतर लॉगिन करून Indian Army TGC Bharti 2026 चा अर्ज काळजीपूर्वक भरावा. आपल्या इंजिनिअरिंग शाखेचा आणि गुणांचा तपशील अचूक भरणे आवश्यक आहे, कारण चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केला जाऊ शकतो.
भारतीय सैन्यात तांत्रिक अधिकारी म्हणून करिअर करण्याची आणि मानाचे जीवन जगण्याची ही एक उत्तम संधी आहे. त्यामुळे पात्र तरुण अभियंत्यांनी मुदतीपूर्वी आपला अर्ज नक्की सादर करावा.
हे पण वाचा :
- 🛑 मोठी भरती ! भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) अंतर्गत तब्बल 4098 जागांची भरती सुरु ! अर्ज कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण माहिती
- IOB LBO Bharti 2026: इंडियन ओव्हरसीज बँकेत लोकल बँक ऑफिसर पदांची मोठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.








