Konkan Railway Apprentice Bharti 2026 : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (KRCL) तरुणांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. रेल्वे विभागाने अधिकृत परिपत्रक जारी करून राष्ट्रीय प्रशिक्षण योजनेअंतर्गत विविध विभागांसाठी अप्रेंटिस पदांच्या जागा जाहीर केल्या आहेत. जर तुम्ही इंजिनिअरिंग पदवीधर, डिप्लोमा धारक किंवा सामान्य पदवीधर असाल तर तुम्हाला कोकण रेल्वेमध्ये काम करण्याचा उत्तम अनुभव घेता येणार आहे. या भरती प्रक्रियेत पात्र उमेदवारांची निवड थेट गुणवत्तेच्या (Merit) आधारावर केली जाणार असून यासाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. महाराष्ट्रातील आणि विशेषतः कोकण किनारपट्टी भागातील हजारो तरुण या संधीची वाट पाहत होते. या लेखात आपण शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, विद्यावेतन (Stipend) आणि थेट कागदपत्र पडताळणीच्या (Document Verification) तारखांबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
Konkan Railway Apprentice Bharti 2026 : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (KRCL) भरती 2026
Advertisement
| Post Date : 10 ऑगस्ट 2026 | Last Date : 24, 25, 27 & 28 ऑगस्ट 2026 |
Konkan Railway Apprentice Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
भरती विभाग : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (KRCL)
एकूण पदसंख्या : 134 जागा
पदांचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | पदवीधर अप्रेंटिस | 60 |
| 2 | टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस | 54 |
| 3 | जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस | 20 |
शैक्षणिक पात्रता :
- पदवीधर अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.
- टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.
- जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस: BA/B.Com/B.Sc/BBA/BMS/पत्रकारिता आणि जनसंवाद / व्यवसाय अभ्यास पदवी
Konkan Railway Apprentice Bharti 2026 Links
| 📌 संपूर्ण जाहिरात pdf | येथे क्लिक करा |
| 🔗 ऑनलाईन अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 जानेवारी 2026 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 25 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 12,300/-रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : कोकण रेल्वे कार्यक्षेत्र.
कागदपत्रे पडताळणीचे ठिकाण : Executives Club, Konkan Rail Vihar, Sector-40, Opp. Seawoods Railway Station (West), Navi Mumbai-400706
कागदपत्रे पडताळणी तारीख :
- २४ ऑगस्ट २०२६ : BE सिव्हिल, डिप्लोमा सिव्हिल आणि BE इलेक्ट्रॉनिक्स
- २५ ऑगस्ट २०२६ : BE इलेक्ट्रिकल, डिप्लोमा इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स
- २७ ऑगस्ट २०२६ : BE मेकॅनिकल आणि डिप्लोमा मेकॅनिकल
- २८ ऑगस्ट २०२६ : जनरल स्ट्रीम ग्रॅज्युएट्स (BA, B.Com, BSc इ.)
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
काही महत्त्वाच्या अटी व मर्यादा :
- परमनंट नोकरीची हमी नाही: हे केवळ एक वर्षाचे व्यावसायिक प्रशिक्षण आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कोकण रेल्वेमध्ये कायमस्वरूपी नोकरीची कोणतीही हमी दिली जात नाही.
- अनुभव नसणे आवश्यक: ज्या उमेदवारांनी यापूर्वी कुठेही अप्रेंटिसशिप केली आहे किंवा ज्यांना १ वर्षापेक्षा जास्त कामाचा अनुभव आहे, ते या भरतीसाठी पात्र ठरत नाहीत.
- NATS नोंदणी अनिवार्य: प्रत्यक्ष पडताळणीला जाण्यापूर्वी उमेदवारांनी राष्ट्रीय प्रशिक्षण योजनेच्या (NATS) अधिकृत पोर्टलवर नोंदणी करून आपला NATS आयडी मिळवणे गरजेचे आहे.
- कागदपत्र पडताळणीसाठी जाताना आपल्यासोबत सर्व मूळ प्रमाणपत्रे (Marksheets, Degree, Caste Certificate, ID Proof) आणि त्यांच्या छायांकित प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे. रेल्वे क्षेत्रातील कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आणि भविष्यातील करिअरची पायाभरणी करण्यासाठी ही एक अत्यंत सुरक्षित आणि प्रतिष्ठेची संधी आहे.
हे पण वाचा :
- 🛑 मोठी भरती ! भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) अंतर्गत तब्बल 4098 जागांची भरती सुरु ! अर्ज कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण माहिती
- 🎯Talathi Bharti 2026 : 1539 जागा फक्त पदवीधरांना सुवर्णसंधी! जाणून घ्या वयोमर्यादा, पात्रता आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.












