MPSC GROUP C BHARTI 2026 : मुलाखत बंद, थेट निवड! 2619 पदांसाठी भरती ! येथे अर्ज करा.

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
MPSC GROUP C BHARTI 2026

MPSC GROUP C BHARTI 2026 : महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 परीक्षेसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून तब्बल 2619 पदांसाठी भरती होणार असून पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार आहे. भरती मध्ये “उद्योग निरीक्षक,तांत्रिक सहायक,कर सहायक,सहायक मोटार वाहन निरीक्षक, लिपिक टंकलेखक” हि पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना मोठी संधी निर्माण झाली आहे. भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

MPSC GROUP C BHARTI 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

भरती विभाग : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026

एकूण पदसंख्या : 2619 जागा

पदांचे नाव :

शैक्षणिक पात्रता :

  • उद्योग निरीक्षक : सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी
  • कर सहायक : i) पदवीधर  ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  • तांत्रिक सहायक : पदवीधर
  • लिपिक-टंकलेखक : i) पदवीधर ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

सहायक मोटार वाहन निरीक्षक शारीरिक अहर्ता :

MPSC GROUP C BHARTI 2026 Links

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक हे 01 ऑक्टोंबर 2026 रोजी किमान 18/19 वर्ष ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे. (मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ : 05 वर्षे सूट)

अर्ज शुल्क :  खुला प्रवर्ग : ₹544/- रुपये   (मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ : ₹344/-रुपये )

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 29,200/- रुपये ते 92,300/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

MPSC GROUP C BHARTI 2026 निवड प्रक्रिया

  • १. अर्जांची छाननी (Shortlisting Process)
    • स्वरूप: वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न (Objective Type MCQ).
    • गुण: एकूण १०० गुण (१०० प्रश्न).
    • परीक्षा पद्धती: संगणक आधारित चाचणी (CBT – Computer Based Test).
    • महत्त्व: हा केवळ पात्रता (Screening) टप्पा आहे, याचे गुण अंतिम गुणवत्ता यादीत धरले जात नाहीत.
  • २. मुख्य परीक्षा (Main Examination)
    • पूर्व परीक्षेत पात्र ठरलेले उमेदवार या परीक्षेसाठी पात्र असतात.
    • स्वरूप: वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न (Objective Type).
    • गुण: एकूण ४०० गुण (सहायक मोटार वाहन निरीक्षक – AMVI पदासाठी ३०० गुण).
    • पेपर: यामध्ये सामान्यतः दोन पेपर असतात. पेपर-१ सर्वांसाठी संयुक्त असतो आणि पेपर-२ हा पदानुसार स्वतंत्र असतो.
    • महत्त्व: अंतिम निवड यादी पूर्णपणे मुख्य परीक्षेतील गुणांवर तयार केली जाते.
  • ३. कौशल्य चाचणी / शारीरिक चाचणी
    • लिपिक-टंकलेखक (Clerk-Typist) आणि कर सहायक (Tax Assistant): शासनमान्य टंकलेखन कौशल्य चाचणी (Typing Skill Test) उत्तीर्ण होणे आवश्यक आहे (मराठी ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी ४० श.प्र.मि.). ही चाचणी केवळ पात्रता स्वरूपाची (Qualifying) असते.
    • सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI): शारीरिक मानके (Physical Standards) आणि वैद्यकीय तपासणी (Medical Test) उत्तीर्ण करावी लागते.
  • ४. कागदपत्र पडताळणी (Document Verification – DV)
    • सर्व टप्पे पार केल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, वयाचा पुरावा, जातीचे प्रमाणपत्र आणि टायपिंग प्रमाणपत्रांची मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी सादर करावी लागतात.
    • कागदपत्रे वैध आढळल्यास शासनाच्या संबंधित विभागात नियुक्ती केली जाते.

MPSC GROUP C BHARTI 2026 अभ्यासक्रम

१. संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम (एकूण गुण: १००)

पूर्व परीक्षा सर्व पदांसाठी एकच (संयुक्त) असते. यामध्ये खालील घटकांचा समावेश होतो:

  • इतिहास: आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास.
  • भूगोल: महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह – पृथ्वी, जागतिक विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, नद्या, उद्योगधंदे व लोकसंख्या.
  • भारतीय अर्थव्यवस्था: राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती. शासकीय अर्थव्यवस्था- अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी.
  • भारतीय राज्यशास्त्र (Polity): ग्रामप्रशासन, राज्य प्रशासन आणि संविधानाची प्राथमिक माहिती.
  • सामान्य विज्ञान (General Science): भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), प्राणीशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany) आणि हायजीन (Hygiene).
  • चालू घडामोडी (Current Affairs): जागतिक तसेच भारतातील व महाराष्ट्रातील चालू घडामोडी.
  • अंकगणित व बुद्धीमापन चाचणी (Aptitude & Reasoning):
    • बुद्धीमापन: उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे अजमावण्यासाठी प्रश्न.
    • अंकगणित: बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक, टक्केवारी आणि सरासरी.

२. मुख्य परीक्षा अभ्यासक्रम (एकूण गुण: ४००)

मुख्य परीक्षेत एकूण दोन पेपर असतात. प्रत्येक पेपर २०० गुणांचा असतो.

पेपर क्रमांक १: संयुक्त पेपर (गुण: २००)

हा पेपर सर्व पदांसाठी सारखाच आणि अनिवार्य असतो.

  • मराठी (गुण: १००): सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.
  • इंग्रजी (गुण: १००): Common Vocabulary, Sentence Structure, Grammar, Idioms & Phrases and their meaning and use, Comprehension of passage.

पेपर क्रमांक २: पदानुसार स्वतंत्र पेपर (गुण: २००)

या पेपरमध्ये सामान्य क्षमता चाचणी आणि तुम्ही निवडलेल्या पदाच्या कामाशी संबंधित तांत्रिक/विशिष्ट विषयांचा समावेश होतो:

  • लिपिक-टंकलेखक (Clerk-Typist): सामान्य ज्ञान, माहिती अधिकाराचा कायदा (RTI), संगणक व माहिती तंत्रज्ञान (IT) आणि कार्यालयीन कामकाजाची पद्धत.
  • कर सहायक (Tax Assistant): बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी (Book-keeping & Accountancy), ऑडिटिंग, आणि अर्थशास्त्राचे मूलभूत ज्ञान (विशेषतः कर प्रणाली).
  • दुय्यम निरीक्षक (Sub-Inspector – Excise): मानवी हक्क व जबाबदाऱ्या, मुंबई दारूबंदी कायदा आणि संबंधित उत्पादन शुल्क विषयक कायदे.
  • उद्योग निरीक्षक (Industry Inspector): भारताच्या आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाशी संबंधित कायदे, धोरणे आणि पायाभूत सुविधा.
  • सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI): (टीप: या पदासाठी ३०० गुणांची स्वतंत्र तांत्रिक मुख्य परीक्षा होते). यामध्ये मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगशी संबंधित तांत्रिक विषयांचा समावेश असतो.

गुणांकन पद्धत (Marking Scheme)

  • नकारात्मक गुणांकन (Negative Marking) : दोन्ही परीक्षांमध्ये १:४ (२५%) अशी निगेटिव्ह मार्किंग लागू आहे. म्हणजेच, प्रत्येक ४ चुकीच्या उत्तरांमागे १ बरोबर प्रश्नाचे गुण वजा केले जातील.

नोकरी चे ठिकाण : अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई & पुणे

अर्ज सादर करण्याची प्रक्रिया/कालावधी :

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अनुभव याबाबतचा तपशील पूर्ण आहे का याची खात्री करावी.
  • सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
  • सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
  • अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक 17 जुलै 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

हे पण वाचा :

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

तुम्हाला हे देखील आवडेल

Leave a Comment