Ship Building Centre Recruitment 2026 : 10वी आणि आयटीआय पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
Ship Building Centre Recruitment 2026

Ship Building Centre Recruitment 2026 : भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या विशाखापट्टणम येथील शिप बिल्डिंग सेंटरद्वारे ग्रुप ‘C’ पदांसाठी नवीन भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या अंतर्गत तांत्रिक आणि गैर-मंत्रालयीन विभागातील विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत.

१०वी उत्तीर्ण आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) प्रमाणपत्र धारक तरुण सध्या या भरती प्रक्रियेबद्दल इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर शोध घेत आहेत. या लेखामध्ये आपण पात्रता निकष, वयोमर्यादा, उपलब्ध पदे आणि अर्ज कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Ship Building Centre Recruitment 2026 : शिप बिल्डिंग सेंटर भरती 2026

Post Date : 24 ऑगस्ट 2026Last Date : 16 सप्टेंबर 2026

www.marathigurumahajobs.in

Ship Building Centre Recruitment 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

भरती विभाग : शिप बिल्डिंग सेंटर

एकूण पदसंख्या : 09 जागा

पदांचे नाव :

शैक्षणिक पात्रता :

  • कन्स्ट्रक्शन असिस्टंट आणि हँडलर : उमेदवार किमान १०वी उत्तीर्ण असावा आणि त्याच्याकडे मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेडमधील आयटीआय (ITI) किंवा नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट (NAC) असणे बंधनकारक आहे. याशिवाय कन्स्ट्रक्शन असिस्टंट पदासाठी दोन वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक आहे.
  • ड्रायव्हर पदे : उमेदवार १०वी पास असण्यासोबतच त्याच्याकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स (अवजड/हलकी वाहने) असणे गरजेचे आहे. तसेच वाहन चालवण्याचा किमान ३ वर्षांचा अनुभव आणि मोटार मेकॅनिझमचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे.

Ship Building Centre Recruitment 2026 Links

वयोमर्यादा : सर्वसाधारणपणे उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षे (काही पदांसाठी ३० किंवा ३२ वर्षांपर्यंत) असणे आवश्यक आहे. सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

अर्ज शुल्क : GEN/OBC/EWS : 350/- रू. SC/ST : अर्ज शुल्क नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 30,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण :  विशाखापट्टणम

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 14 सप्टेंबर 2026

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

ऑनलाईन अर्ज कसा करावा?

  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवर जाऊन नवीन नोंदणी (Registration) पूर्ण करा.
  • नोंदणीकृत ईमेल आणि मोबाईल नंबरवर आलेला आयडी वापरून लॉगिन करा.
  • अर्जामध्ये वैयक्तिक, शैक्षणिक आणि अनुभवाची माहिती अचूक भरा.
  • फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्रे (१०वी, आयटीआय सर्टिफिकेट, लायसन्स) स्कॅन करून अपलोड करा.
  • लागू असल्यास ऑनलाइन फी भरून अर्ज सबमिट करा आणि प्रिंटआउट काढून ठेवा.

हे पण वाचा :

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


तुम्हाला हे देखील आवडेल

Leave a Comment