Thane Mahangarpalika Bharti 2024 : ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती निघाली असून पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये एकूण 063 रिक्त पदे असून केवळ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे,तसेच महानगरपालिका मध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या भरती ची जाहिरात हि ठाणे महानगरपालिका यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. भरती विषयी अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Thane Mahangarpalika Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन ( offline )
एकूण पदसंख्या : 063 रिक्त पदे
भरती विभाग : ठाणे महानगरपालिका अंतर्गत
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र . | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | शस्त्रक्रिया सहाय्यक | 15 |
02 | न्हावी | 02 |
03 | ड्रेसर | 10 |
04 | वार्ड बॉय | 11 |
05 | दवाखाना आया | 17 |
06 | पोस्टमार्टम अटेंडंट | 04 |
07 | मॉच्युरी अटेंडंट | 04 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : i) महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा विज्ञान शाखेतील जीवशास्त्र विषयासह उत्तीर्ण. ii) शासन मान्यताप्राप्त संस्थेकडील ओ.टी.टेक्नॉलॉजी मधील पदविका आवश्यक.iii) मान्यताप्राप्त विद्यापीठाची ओ.टी.टेक्नॉलॉजी मधली पदवी असल्यास, प्राधान्य, iv) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्थेच्या हॉस्पीटलकडील शस्त्रक्रिया सहायक अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव. v) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
- पद क्र.02 : i) महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (S.S.C.) ii) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्थेकडील न्हावी (बार्बर) अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव. iii) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
- पद क्र.03 : i) महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (S.S.C.) ii) शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडील ड्रेसर अभ्यासक्रम पूर्ण व तनंतर एन.सी.टी.व्ही.टी.चे प्रमाणपत्र आवश्यक iii) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्थेच्या हॉस्पीटलकडील ड्रेसर या कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव. iv) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
- पद क्र.04 : i) महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (S.S.C.) ii) शासनमान्य संस्थेकडील रुग्ण सहायक प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण असल्यास प्राधान्य iii) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्थेच्या हॉस्पीटलकडील वॉर्डबॉय या कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव iv) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
- पद क्र.05 : i) महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (S.S.C.) ii) शासनमान्य संस्थेकडील रुग्णवैद्यकीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण असल्यास प्राधान्य iii) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्थेच्या हॉस्पीटलकडील दवाखाना आया या कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव. iv) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
- पद क्र.06 : i) महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (S.S.C.) ii) पोस्ट मार्टम कामाचा एक वर्षाचा अनुभव iii) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
- पद क्र.07 : i) महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (S.S.C.) ii) पोस्ट मार्टम कामाचा एक वर्षाचा अनुभव iii) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते 70 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 20,000/- रुपये मासिक पगार दिला जाईल .
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत
निवड प्रक्रिया : मुलाखती द्वारे
नोकरीचे ठिकाण : ठाणे (jobs in Thane)
मुलाखतीचे ठिकाण : कै.अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे
मुलाखतीचा दिनांक : लवकरच कळविण्यात येईल.
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने असून थेट मुलाखतीवर निवड प्रक्रिया आहे.
- वरील पत्यावर दिलेल्या वेळेत स्वखर्चाने उपस्थित राहावे.
- मुलाखतीला जाताना तिथे स्वताचा चालू मोबाईल नंबर द्यावा.
- उमेदवारांनी मुलाखतीला जाण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे पण वाचा : Mumbai Port Authority : मुंबई पत्तन प्राधिकरण अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी भरती सुरु ! त्वरित येथे आवेदन करा !
हे आपल्या मित्रांना पाठवा !