मोठ्ठी भरती : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ व्हा! जाणून घ्या संपूर्ण माहिती ! SBI PO Bharti 2026

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
SBI PO Bharti 2026

SBI PO Bharti 2026 : भारतीय स्टेट बँक अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण तब्बल १५00 जागांसाठी भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी बँकेत नोकरी मिळणार असून भरती विषयक लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

SBI PO Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

भरती विभाग : भारतीय स्टेट बँक

एकूण पदसंख्या : १५०० रिक्त जागा

पदांचे नाव :  प्रोबेशनरी ऑफिसर (PO)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)

SBI PO Bharti 2026 Links

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक हे 01 एप्रिल 2026 रोजी किमान २१ वर्ष ते कमाल ३० वर्षांपर्यंत वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क :

  • Gen/OBC/EWS : 750/- रुपये
  • SC/ST/PWD : अर्ज शुल्क नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 48,480/- रुपये ते 85920/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.


निवड प्रक्रिया : SBI PO भरती 2026 ची निवड प्रक्रिया प्रामुख्याने तीन टप्प्यांत पार पडते. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) २०२६-२७ या वर्षासाठी १,५०० प्रोबेशनरी ऑफिसर्स (PO) पदांची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. उमेदवारांना अंतिम निवडीसाठी तिन्ही टप्पे यशस्वीरित्या पार करणे आवश्यक आहे.

टप्पा-१ : पूर्व परीक्षा (Phase-I: Preliminary Examination)

  • ही परीक्षा केवळ पात्रतेसाठी (Qualifying) असते, याचे गुण अंतिम गुणवत्ता यादीत (Final Merit) जोडले जात नाहीत.
  • परीक्षा १०० गुणांची असून ती ऑनलाइन पद्धतीने घेतली जाते.
  • यासाठी १ तासाचा वेळ मिळतो आणि यात ३ विभाग असतात:इंग्रजी भाषा (English Language) – ३० गुण
    संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude) – ३५ गुण
    बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning Ability) – ३५ गुण
  • नेगेटिव्ह मार्किंग: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/४ (०.२५) गुण वजा केले जातात.

टप्पा-२ : मुख्य परीक्षा (Phase-II: Main Examination)

पूर्व परीक्षेतून निवडलेले उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतात. ही परीक्षा एकूण २५० गुणांची असते आणि ती संपूर्णपणे ऑनलाइन संगणकावर होते. यामध्ये दोन प्रकारच्या चाचण्या असतात.

  • वस्तुनिष्ठ चाचणी (Objective Test): एकूण २०० गुणांची असून ३ तास वेळ असतो. यात बुद्धिमत्ता (Reasoning), डेटा विश्लेषण (Data Analysis), सामान्य/बँकिंग जागरूकता (General/Economy/Banking Awareness) आणि इंग्रजी विषयांचा समावेश असतो.
  • वर्णनात्मक चाचणी (Descriptive Test): वस्तुनिष्ठ चाचणी संपल्यानंतर लगेच ५० गुणांची वर्णनात्मक परीक्षा सुरू होते. उमेदवारांना संगणकावर टाईप करून उत्तरे लिहावी लागतात. २०२६ च्या नवीन पॅटर्ननुसार यात ईमेल (Emails), रिपोर्ट्स (Reports) आणि सिच्युएशन अनालिसिस (Situation Analysis) किंवा प्रिसिस रायटिंग (Precis Writing) या घटकांवर प्रश्न विचारले जातात.

टप्पा-३ : सायकोमेट्रिक चाचणी आणि मुलाखत (Phase-III)

  • सायकोमेट्रिक चाचणी (Psychometric Test): उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाची चाचणी घेण्यासाठी बँक ही परीक्षा घेते.
  • गट चर्चा (Group Exercise) आणि मुलाखत (Interview): हा टप्पा एकूण ५० गुणांचा (गट चर्चा २० गुण + वैयक्तिक मुलाखत ३० गुण) असतो. यामध्ये उमेदवाराचे संवाद कौशल्य आणि नेतृत्व गुणांचे मूल्यांकन केले जाते.

SBI PO Bharti 2026 अभ्यासक्रम

१. पूर्व परीक्षा अभ्यासक्रम (Preliminary Exam Syllabus)

इंग्रजी भाषा (English Language – ३० गुण):

  • रीडिंग कॉम्प्रिहेन्शन (Reading Comprehension)
  • एरर डिटेक्शन (Error Detection / Spotting Error)
  • क्लोज टेस्ट (Cloze Test)
  • पॅराजंबल्स (Para Jumbles)
  • फिल इन द ब्लँक्स (Fill in the blanks)
  • सिनोनिम्स आणि अँटोनिम्स (Synonyms & Antonyms)

संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude – ३५ गुण):

  • डेटा इंटरप्रिटेशन (DI – Bar, Line, Pie Chart, Tabular, Caselet)
  • संख्या मालिका (Number Series – Missing & Wrong)
  • वर्गसमीकरणे (Quadratic Equations)
  • सरलीकरण आणि अंदाजीकरण (Simplification & Approximation)
  • अंकगणित (Averages, Profit & Loss, Percentage, Ratio, Simple/Compound Interest, Time & Work, Speed & Distance)

बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning Ability – ३५ गुण):

  • बैठकीची व्यवस्था आणि कोडी (Seating Arrangement & Puzzles)
  • सिलॉजिझम (Syllogism)
  • कोडिंग-डिकोडिंग (Coding-Decoding)
  • दिशा आणि अंतर (Direction & Distance)
  • नातेसंबंध (Blood Relations)
  • असमानता (Inequalities)
  • अल्फान्युमेरिक सिरीज (Alphanumeric Series)

२. मुख्य परीक्षा अभ्यासक्रम (Main Exam Syllabus)

अ) वस्तुनिष्ठ चाचणी (Objective Test – २०० गुण)

बुद्धिमत्ता आणि संगणक अभियोग्यता (Reasoning & Computer Aptitude):

  • उच्च पातळीवरील कोडी (Advanced Puzzles & Seating Arrangement)
  • इनपुट-आउटपुट (Machine Input-Output)
  • कोडेड असमानता आणि नातेसंबंध (Coded Inequalities & Blood Relations)
  • तार्किक बुद्धिमत्ता (Critical / Logical Reasoning)
  • डेटा सफिशियन्सी (Data Sufficiency)
  • संगणक ज्ञान (Computer Hardware, Software, Networking, Internet)

डेटा विश्लेषण आणि अर्थ लावणे (Data Analysis & Interpretation):

  • प्रगत डेटा इंटरप्रिटेशन (Advanced & Missing DI)
  • रडार आणि स्कॅटर चार्ट (Radar Chart, Scatter Graph)
  • संभाव्यता आणि परम्युटेशन-कॉम्बिनेशन (Probability, Permutation & Combination)
  • डेटा सफिशियन्सीवर आधारित अंकगणित (Arithmetic Data Sufficiency)

सामान्य, अर्थव्यवस्था आणि बँकिंग जागरूकता (General/Economy/Banking Awareness):

  • चालू घडामोडी (Current Affairs – मागील ६ महिन्यांचे)
  • बँकिंग प्रणाली आणि नियम (Banking Terms, RBI Guidelines)
  • आर्थिक चालू घडामोडी (Financial & Economic News)
  • सरकारी योजना (Government Schemes & Policies)
  • सामान्य ज्ञान (Static GK – मुख्यालये, चलने, महत्त्वाचे दिवस)

इंग्रजी भाषा (English Language – मुख्य परीक्षा स्तर):

  • प्रगत वाचन आकलन (Advanced Reading Comprehension)
  • वाक्य जोडणे आणि सुधारणा (Sentence Connection & Correction)
  • नवीन पॅटर्नचे क्लोज टेस्ट आणि फिलर्स (New Pattern Cloze Test & Fillers)

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : ०८ जुलै 2026

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अनुभव याबाबतचा तपशील पूर्ण आहे का याची खात्री करावी.
  • सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
  • सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
  • अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक ०८ जुलै 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

SBI PO Bharti 2026 FAQ

Q1. SBI PO साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) आवश्यक आहे.

Q2. पदवीच्या अंतिम वर्षातील (Final Year) उमेदवार अर्ज करू शकतात का?

होय, अंतिम वर्षातील उमेदवार अर्ज करू शकतात, परंतु मुलाखतीच्या वेळी पदवी उत्तीर्ण झाल्याचा पुरावा सादर करावा लागतो.

Q३. वयोमर्यादा काय आहे?

किमान २१ वर्षे आणि कमाल ३० वर्षे. राखीव प्रवर्गातील (SC/ST/OBC/PwBD) उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत मिळते.

Q४. पूर्व परीक्षेत (Prelims) सेक्शनल कट-ऑफ असतो का?

नाही, SBI PO पूर्व परीक्षेत प्रत्येक विषयासाठी वैयक्तिक कट-ऑफ (Sectional Cut-off) नसतो. केवळ एकूण गुणांचा कट-ऑफ पार करावा लागतो.

Q५. परीक्षेत नेगेटिव्ह मार्किंग असते का?

होय, पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षांमधील वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी १/४ (०.२५) गुण वजा केले जातात.

Q६. वर्णनात्मक परीक्षा (Descriptive Test) कशी होते?

ही परीक्षा मुख्य परीक्षेनंतर लगेच ऑनलाइन संगणकावर टाईप करून द्यावी लागते. यात ईमेल, रिपोर्ट आणि सारांश लेखन समाविष्ट असते.

Q7. एक उमेदवार किती वेळा परीक्षा देऊ शकतो (Number of Attempts)?

सामान्य प्रवर्गासाठी (General/EWS) ४ प्रयत्न मर्यादित आहेत. OBC उमेदवारांसाठी ७ प्रयत्न आहेत, तर SC/ST उमेदवारांसाठी प्रयत्नांची कोणतीही मर्यादा नाही. (केवळ मुख्य परीक्षेला उपस्थित राहिल्यास प्रयत्न गणला जातो).

Q८. अर्ज फी किती आहे?

General/OBC/EWS उमेदवारांसाठी ७५० रुपये. SC/ST/PwBD उमेदवारांसाठी कोणतीही फी नसते.


हे पण वाचा : 🌟 BPCL Bharti 2026: भारत पेट्रोलियम मध्ये करिअर करण्याची उत्तम संधी; जाणून घ्या सविस्तर अभ्यासक्रम !

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

तुम्हाला हे देखील आवडेल