PGIMER Bharti 2026 : पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था भरती सुरु ! आजचं येथे अर्ज करा.

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
PGIMER Bharti 2026

PGIMER Bharti 2026 : जर तुम्ही वैद्यकीय संशोधन क्षेत्रात केंद्र सरकारच्या एका प्रतिष्ठित राष्ट्रीय संस्थेमध्ये नोकरी शोधत असाल, तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. भारतातील अग्रगण्य वैद्यकीय संस्था असलेल्या Postgraduate Institute of Medical Education and Research (PGIMER), विविध रिक्त प्रशासकीय पदांसाठी अधिकृत भरतीची घोषणा केली आहे. या PGIMER Bharti 2026 अंतर्गत पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. या लेखामध्ये आपण PGIMER Bharti 2026 ची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत घेणार आहोत. यामध्ये रिक्त जागांचा तपशील, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, मिळणारे आकर्षक वेतन आणि ऑनलाईन अर्ज करण्याची सोपी पद्धत याबद्दलची इत्थंभूत माहिती तुम्हाला वाचायला मिळेल.

PGIMER Bharti 2026 : पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था भरती 2026

Post Date : 10 सप्टेंबर 2026Last Date : 03 ऑक्टोबर 2026 

www.marathigurumahajobs.in

PGIMER Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन

भरती विभाग : पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था (PGIMER Bharti 2026)

एकूण पदसंख्या : 243 रिक्त जागा

पदांचे नाव :

पद क्र.पदांचे नाव पदसंख्या
01नर्सिंग ऑफिसर (ग्रुप B)243

शैक्षणिक पात्रता : B.Sc. (Hons-Nursing) किंवा B.Sc. (Nursing) किंवा GNM डिप्लोमा+ किमान 50 बेडच्या रुग्णालयात एक वर्षाचा अनुभव

PGIMER Bharti 2026 Links

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय हे दिनांक 03 ऑक्टोबर 2026 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 35 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : GEN/OBC/EWS : ₹1500/-रुपये [SC/ST : ₹800/-, PWD: फी नाही]

मासिक वेतन : सदर भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना 44,900/- रुपये इतके आकर्षक मासिक वेतन वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : PGIMER, चंदीगड

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 03 ऑक्टोबर 2026 

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

How to Apply (अर्ज कसा करावा?)

या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येईल. अर्ज करताना खालील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील:

  • सर्वात आधी पीजीआयएमईआर चंदीगडच्या अधिकृत संकेतस्थळाला PGIMER Official Website भेट द्या.
  • होम पेजवरील ‘Information for Candidates’ किंवा ‘Recruitment’ या पर्यायावर क्लिक करून अधिकृत PGIMER Bharti 2026 ची जाहिरात PDF डाऊनलोड करा.
  • ‘Apply Online’ या लिंकवर क्लिक करून स्वतःची नवीन नोंदणी करा आणि लॉगिन आयडी तयार करा.
  • अर्जामध्ये तुमची अचूक वैयक्तिक, शैक्षणिक आणि तांत्रिक माहिती भरा.
  • तुमचे आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी योग्य आकारात अपलोड करा.

हे पण वाचा :

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

तुम्हाला हे देखील आवडेल

Leave a Comment