Konkan Railway Bharti 2026: कोकण रेल्वेत 201 रिक्त पदांसाठी मेगा भरती सुरू, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
Konkan Railway Bharti 2026

Konkan Railway Bharti 2026 : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) अंतर्गत सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कोकण रेल्वेने विविध विभागांमधील तांत्रिक आणि बिगर-तांत्रिक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन रेल्वे क्षेत्रात आपले करिअर घडवू इच्छिणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

या नवीन अपडेटनुसार, Konkan Railway Bharti 2026 ची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाली असून एकूण २०१ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या लेखात आम्ही तुम्हाला या भरती प्रक्रियेचा सविस्तर तपशील जसे की शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, उपलब्ध पदे, निवड प्रक्रिया आणि अर्ज कसा करावा याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत. जर तुम्ही या पदांसाठी पात्र असाल तर हा लेख लक्षपूर्वक वाचा.

Konkan Railway Bharti 2026 : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) भरती 2026

Post Date : 11 सप्टेंबर 2026Last Date : 28 सप्टेंबर 2026

www.marathigurumahajobs.in

Konkan Railway Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

भरती विभाग : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL)

एकूण पदसंख्या : 201 जागा

पदांचे नाव :

शैक्षणिक पात्रता :

  1. पद क्र.1 : सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc (Civil Engineering)
  2. पद क्र.2 : 10वी उत्तीर्ण
  3. पद क्र.3 : इंजिनिअरिंग पदवी (Electrical/ Electronics/IT /Communication Engineering /Computer Science & Engineering /Computer Science /Computer Engineering किंवा M.Sc. (Electronics)
  4. पद क्र.4 : 10वी उत्तीर्ण + NCVT/SCVT (इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / वायरमन) किंवा 12वी (भौतिकशास्त्र आणि गणित) उत्तीर्ण
  5. पद क्र.5 : कोणत्याही शाखेतील पदवी
  6. पद क्र.6 : कोणत्याही शाखेतील पदवी
  7. पद क्र.7 : कोणत्याही शाखेतील पदवी
  8. पद क्र.8 : 10वी उत्तीर्ण + NCVT/SCVT (आर्मेचर & कॉइल वाइंडर/ इलेक्ट्रिशियन/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ फिटर/ हीट इंजिन/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/ मशिनिस्ट/ मेकॅनिक डिझेल/मेकॅनिक (मोटर व्हेईकल)/ मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक/ मेकॅनिक रेडिओ अ‍ॅण्ड TV/ रेफ.& AC मेकॅनिक/ ट्रॅक्टर मेकॅनिक/ टर्नर/ वायरमन) किंवा 10वी उत्तीर्ण + संबंधित अप्रेंटिसशिप किंवा 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  9. पद क्र.9 : इंजिनिअरिंग पदवी (Mechanical /Electrical/ Electronics/ Manufacturing/ Mechatronics/ Industrial/ Machining/ Instrumentation & Control/ Tools & Machining / Tools & Die Making / Automobile /Production Engineering) किंवा समतुल्य
  10. पद क्र.10 : इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical/ Electronics/ Manufacturing/ Mechatronics/ Industrial/ Machining/ Instrumentation & Control/ Tools & Machining/ Tools & Die Making/ Automobile/Production Engineering) किंवा समतुल्य
  11. पद क्र.11 : 10वी उत्तीर्ण + NCVT/SCVT [फिटर / मेकॅनिक डिझेल / मेकॅनिक (रिपेअर अ‍ॅण्ड मेंटेनन्स ऑफ हेवी व्हेईकल्स) / मेकॅनिक ऑटोमोबाईल (अ‍ॅडव्हान्स्ड डिझेल इंजिन) / मेकॅनिक (मोटर व्हेईकल) / ट्रॅक्टर मेकॅनिक / वेल्डर / पेंटर / इलेक्ट्रिशियन / वायरमन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / मेकॅनिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिक (HT, LT इक्विपमेंट्स अ‍ॅण्ड केबल जॉइंटिंग)] किंवा 10वी उत्तीर्ण + CCAA
  12. पद क्र.12 : कोणत्याही शाखेतील पदवी

Konkan Railway Bharti 2026 Links

वयोमर्यादा :  पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 ऑगस्ट 2026 रोजी 18 वर्ष ते 36/45 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS : ₹1180/-रुपये SC/ST/PWD :  CBT (संगणक-आधारित चाचणी) ला उपस्थित राहिल्यास शुल्क परत केले जाते (बँक शुल्क वजा करून)

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 18,000/-रुपये ते 44,900/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 28 सप्टेंबर 2026

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
  • सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
  • अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

हे पण वाचा :

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

तुम्हाला हे देखील आवडेल

Leave a Comment