IOB LBO Hall Ticket 2026 : इंडीयन ओव्हरसीज बँक (IOB) लोकल बँक ऑफिसर (LBO) हॉल तिकीट २०२६ अधिकृतपणे प्रसिद्ध झाले आहे. ज्या उमेदवारांनी २५० लोकल बँक ऑफिसर (JMGS-I) पदांसाठी अर्ज केला आहे, ते बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून त्यांचे कॉल लेटर डाउनलोड करू शकतात.
IOB LBO Hall Ticket 2026 : इंडियन ओव्हरसीज बँक प्रवेशपत्र उपलब्ध
| Post Date : 18 सप्टेंबर 2026 | Last Date : 29 सप्टेंबर 2026 |
IOB LBO Hall Ticket 2026 परीक्षेचे वेळापत्रक
IOB LBO ची ऑनलाईन परीक्षा २४ सप्टेंबर २०२६ आणि २९ सप्टेंबर २०२६ रोजी भारतातील विविध केंद्रांवर घेतली जाणार आहे. उमेदवारांना त्यांचे परीक्षा केंद्र, वेळ आणि सत्र याबद्दलची सविस्तर माहिती हॉल तिकीटवर मिळेल.
💻 हॉल तिकीट डाउनलोड करण्याचे सोपे टप्पे
१. सर्वप्रथम इंडीयन ओव्हरसीज बँकेच्या अधिकृत वेबसाईटला (iob.bank.in) भेट द्या.
२. होमपेजवरील ‘Careers’ (करिअर) या पर्यायावर क्लिक करा.
३. “Recruitment of Local Bank Officers 2026-27” या लिंक अंतर्गत ‘LBO Online Examination Call Letter’ वर क्लिक करा.
४. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर / रोल नंबर आणि पासवर्ड / जन्मतारीख टाका .
५. स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड भरून ‘Submit’ करा.
६. तुमचे हॉल तिकीट स्क्रीनवर दिसेल, ते डाउनलोड करा आणि त्याची स्पष्ट प्रिंटआउट काढा.
IOB LBO Hall Ticket 2026 Links
| प्रवेशपत्र / हॉल तिकीट | येथे क्लिक करा |
परीक्षा केंद्रावर जाताना घ्यायची काळजी;
हॉल तिकीटची प्रिंट : परीक्षा कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी हॉल तिकीटची छापील प्रत असणे अनिवार्य आहे.
ओळखपत्र (ID Proof) : मूळ आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट यांपैकी एक वैध ओळखपत्र आणि त्याची झेरॉक्स सोबत ठेवा.
वेळेचे नियोजन : हॉल तिकीटवर दिलेल्या रिपोर्टिंग वेळेच्या किमान ३० मिनिटे आधी परीक्षा केंद्रावर पोहोचा.
प्रतिबंधित वस्तू : परीक्षा केंद्रात मोबाईल, डिजिटल घड्याळ किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅझेट नेण्यास सक्त मनाई आहे.
महत्वाचे : उमेदवारांनी शेवटच्या क्षणाची घाई टाळण्यासाठी २९ सप्टेंबर २०२६ पूर्वीच आपले हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यावे.
हे पण वाचा :
- 🛑 Gramin Dak Sevak GDS Bharti 2026 : परीक्षा नाही, मुलाखत नाही; थेट 10 वीच्या मार्कांवर मिळणार नोकरी!
- 🛑MSRTC Dharashiv Bharti 2026: एसटी महामंडळ धाराशिव विभागात भरती सुरू; येथे करा अर्ज
- 🛑 Pune Mahanagarpalika Bharti 2026 : पुणे महानगरपालिका अंतर्गत आरोग्य पदांची भरती सुरु ! येथे अर्ज करा.
- 🛑 Income Tax Department Vacancy 2026 : आयकर विभाग अंतर्गत नवीन पदांची भरती सुरु ! येथे अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.






