IBPS Clerk Bharti 2026 : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) द्वारे देशभरातील विविध सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये लिपिक (Clerk) पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या आणि पदवी पूर्ण केलेल्या 11403 जागांसाठी उमेदवारांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची संधी मानली जात आहे, या लेखामध्ये आपण या भरती प्रक्रियेचा संपूर्ण तपशील, रिक्त पदांची संख्या, आवश्यक शैक्षणिक पात्रता, परीक्षेचे स्वरूप आणि ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. जर तुम्ही या परीक्षेची तयारी करत असाल, तर हा लेख तुम्हाला अर्ज प्रक्रियेत मदत करेल.
IBPS Clerk Bharti 2026 : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन भरती 2026
Advertisement
| Post Date : 03 ऑगस्ट 2026 | Last Date : 21 ऑगस्ट 2026 |
IBPS Clerk Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
भरती विभाग : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS Clerk)
एकूण पदसंख्या : 11403 जागा
पदांचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | क्लर्क (Clark) | 11403 |
शैक्षणिक पात्रता :
- शैक्षणिक पात्रता: उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation Degree) असणे आवश्यक आहे. याशिवाय संगणक प्रणालीचे (Computer Literacy) प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे आहे.
- प्रादेशिक भाषेचे ज्ञान: उमेदवार ज्या राज्यातून अर्ज करत आहे, त्या राज्याची अधिकृत भाषा (उदा. महाराष्ट्रासाठी मराठी) त्याला लिहिता, वाचता आणि बोलता येणे अनिवार्य आहे.
Selection Process : परीक्षेचे स्वरूप आणि निवड पद्धत
या भरतीसाठी उमेदवारांची निवड पूर्णपणे ऑनलाईन परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारावर केली जाते. ही प्रक्रिया दोन मुख्य टप्प्यांत पार पडते:
| परीक्षेचा टप्पा | एकूण गुण | परीक्षेचे स्वरूप |
|---|---|---|
| १. पूर्व परीक्षा (Preliminary) | १०० गुण | ऑनलाईन (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी) |
| २. मुख्य परीक्षा (Main Exam) | २०० गुण | ऑनलाईन (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी) |
लिपिक पदासाठी कोणतीही मुलाखत (Interview) घेतली जात नाही. पूर्व परीक्षा केवळ मुख्य परीक्षेच्या पात्रतेसाठी असते, तर अंतिम निवड यादी ही मुख्य परीक्षेतील गुणांच्या आधारावर तयार केली जाते.
IBPS Clerk Bharti 2026 Links
| संपूर्ण जाहिरात pdf | येथे क्लिक करा |
| Online अर्ज | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 ऑगस्ट 2026 रोजी 20 वर्ष ते 28 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : General/OBC/EWS : ₹850/-रुपये [SC/ST/PWD : ₹175/-रुपये]
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 28070/-रुपये ते 64,480/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत
परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक :

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
- सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
- सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
- अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक 21 ऑगस्ट 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
- अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
हे पण वाचा :









