ICAR NRCG Pune Bharti 2026 : भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) अंतर्गत कार्यरत असलेल्या पुणे येथील भारतीय राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राने (NRCG) रिक्त पदांसाठी अधिकृत भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या अंतर्गत सीनियर रिसर्च फेलो (SRF) आणि यंग प्रोफेशनल-II (YP-II) यांसारख्या विविध संशोधन पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. कृषी क्षेत्र, जैवतंत्रज्ञान आणि वैज्ञानिक संशोधनात रस असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या माहितीपूर्ण लेखामध्ये आपण ICAR NRCG Pune Bharti 2026 अंतर्गत जाहीर झालेल्या पदांचा तपशील, शैक्षणिक पात्रता, वेतनमान आणि अर्ज करण्याच्या पद्धतीबद्दल सविस्तर माहिती सोप्या मराठीत पाहणार आहोत.
ICAR NRCG Pune Bharti 2026 : भारतीय कृषी अनुसंधान परिषद भरती 2026
| Post Date : 31 ऑगस्ट 2026 | Last Date : 14 सप्टेंबर 2026 |
ICAR NRCG Pune Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
भरती विभाग : भारतीय कृषी अनुसंधान परिषद भरती 2026
एकूण पदसंख्या : 1 रिक्त जागा
पदांचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | वरिष्ठ संशोधन फेलो | 1 |
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराकडे बायोइन्फॉरमॅटिक्स (Bioinformatics), बायोटेक्नॉलॉजी (Biotechnology) किंवा मॉलिक्युलर बायोलॉजी (Molecular Biology) या विषयात पदव्युत्तर पदवी (M.Sc.) असणे आवश्यक आहे. सोबतच ४ वर्षांची पदवी किंवा बेसिक सायन्समधील पीजीसह NET पात्रता असणे आवश्यक आहे.
ICAR NRCG Pune Bharti 2026 Links
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : सदर भरती साठी वयोमर्यादा हि किमान 21 वर्ष ते कमाल 45 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.
मासिक वेतन : सदर भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना 37,000/- रुपये इतके आकर्षक मासिक वेतन वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : पुणे
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : Director, ICAR- National Research Centre for Grapes, P.B. No.-3, Manjari Farm Post, Solapur Road, Pune- 412307, Maharashtra.
ऑफलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 14 सप्टेंबर 2026
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
अर्ज कसा आणि कुठे करावा?
ICAR NRCG Pune Bharti 2026 साठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने विहित नमुन्यातील अर्ज पाठवणे बंधनकारक आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:
- उमेदवारांनी ICAR-NRCG च्या अधिकृत वेबसाईटवरून अर्जाचा नमुना डाऊनलोड करावा.
- अर्जासोबत शैक्षणिक प्रमाणपत्रे, गुणांची यादी आणि अनुभवाचे दाखले जोडून ते एका लिफाफ्यात बंद करावेत.
- लिफाफ्यावर प्रकल्पाचे नाव आणि पदाचे नाव स्पष्टपणे लिहून तो ‘संचालक, आयसीएआर-राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी फार्म पोस्ट, सोलापूर रोड, पुणे – ४१२३०७’ या पत्त्यावर १४ सप्टेंबर २०२६ पूर्वी पोहोचेल अशा बेताने स्पीड पोस्ट किंवा नोंदणीकृत पोस्टाने पाठवावा.
हे पण वाचा :
- 🛑 मोठी भरती ! भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) अंतर्गत तब्बल 4098 जागांची भरती सुरु ! अर्ज कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण माहिती
- IOB LBO Bharti 2026: इंडियन ओव्हरसीज बँकेत लोकल बँक ऑफिसर पदांची मोठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.







