करिअरला द्या सरकारी वेग ! BSNL JTO भरतीचे ऑनलाईन अर्ज सुरू; आत्ताच जाणून घ्या सविस्तर माहिती. l BSNL Bharti 2026

BSNL Bharti 2026 : भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) अंतर्गत २०२६ मध्ये ‘कनिष्ठ दूरसंचार अधिकारी’ (Junior Telecom Officer – JTO) पदांच्या एकूण १०० रिक्त जागांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून ३ जुलै २०२६ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

BSNL Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

भरती विभाग : भारत संचार निगम लिमिटेड (BSNL)

एकूण पदसंख्या : 100 रिक्त जागा

पदांचे नाव :  ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर (टेलिकॉम)

शैक्षणिक पात्रता :

उमेदवाराने केंद्र किंवा राज्य शासनाच्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून खालीलपैकी कोणतीही एक पदवी पूर्ण केलेली असावी:

  • इंजिनिअरिंग पदवी: दूरसंचार (Telecommunications), इलेक्ट्रॉनिक्स (Electronics), रेडिओ (Radio), कॉम्प्युटर (Computer), इलेक्ट्रिकल (Electrical), आयटी (I.T) किंवा इन्स्ट्रुमेंटेशन (Instrumentation) शाखेत B.E / B.Tech किंवा समकक्ष पदवी.
  • व्यतिरिक्त पात्रता: इलेक्ट्रॉनिक्स किंवा कॉम्प्युटर सायन्स या विषयातील M.Sc. किंवा संबंधित शाखेतील M.Tech पदवीधारकही पात्र आहेत.

BSNL Bharti 2026 Links

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक हे 03 जुलै 2026 रोजी किमान 20 वर्ष ते कमाल 30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क :

  • Gen / OBC/EWS : 2000/- रुपये
  • SC/ST/PWD : 1000/- रुपये

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 40,500/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया :

1.ऑनलाईन संगणक आधारित परीक्षा (CBT)

  • एकूण प्रश्न : १२० बहुपर्यायी प्रश्न (MCQs)
    एकूण गुण : ४८० गुण (प्रत्येक बरोबर उत्तराला ४ गुण)
    वेळ : ३ तास (१८० मिनिटे)
    नकारात्मक गुण (Negative Marking) : प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १ गुण कापला जाईल.

2. कागदपत्र पडताळणी (Document Verification)

  • CBT परीक्षेतील गुणांच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीनुसार (Merit List) निवडक उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाते. येथे उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, वय, जात प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रांची तपासणी केली जाते.

3. वैद्यकीय तपासणी (Medical Examination)

  • अंतिम निवडीपूर्वी उमेदवारांना BSNL च्या वैद्यकीय मानकांनुसार निश्चित केलेली वैद्यकीय चाचणी उत्तीर्ण करावी लागते.
  • अंतिम नियुक्ती आणि प्रशिक्षण:
    सर्व टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना नियुक्तीपत्र दिले जाते. त्यानंतर त्यांना १० आठवड्यांचे फेज-१ प्रशिक्षण, ४ आठवड्यांचे मैदानी (Field) प्रशिक्षण आणि ६ आठवड्यांचे विशेष प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. तसेच उमेदवारांना ५ वर्षांचा सर्व्हिस बाँड स्वाक्षरित करावा लागतो.

BSNL Bharti 2026 अभ्यासक्रम

अ) इंजिनिअरिंग प्रवाह – १ (Engineering Stream – I)

  • मटेरियल्स आणि कंपोनेंट्स (Materials & Components): इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग साहित्याचे गुणधर्म, वाहक (Conductors), अर्धवाहक (Semiconductors), विसंवाहक (Insulators), चुंबकीय साहित्य, रेझिस्टर्स, कॅपेसिटर्स आणि इंडक्टर्स.
  • फिजिकल इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉन डिवायसेस (Physical Electronics & Electron Devices): जंक्शन थिअरी, डायोड्स (Diodes), BJT, FET, पॉवर स्विचिंग डिवायसेस (SCRs, GTOs, MOSFETs) आणि इंटिग्रेटेड सर्किट्सचे (ICs) मूलभूत प्रकार.
  • नेटवर्क थिअरी (Network Theory): नेटवर्क ग्राफ, केसीएल (KCL), केव्हीएल (KVL), नोडल आणि मेश ॲनालिसिस, नेटवर्क थिअरम्स (Thevenin, Norton, Max Power), आणि ट्रान्झिएंट रिस्पॉन्स.
  • इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी (Electromagnetic Theory): मॅक्सवेलची समीकरणे (Maxwell’s Equations), वेव्ह गाईड्स (Wave guides), अँटेनाचे प्रकार आणि वेव्ह प्रोपॅगेशन.
  • इलेक्ट्रॉनिक मेझरमेंट्स (Electronic Measurements & Instrumentation): अचूकता आणि त्रुटी (Accuracy & Errors), डिजिटल व्होल्टमीटर, ऑसिलोस्कोप (CRO), ट्रान्सड्यूसर्स (Transducers) आणि सिग्नल जनरेटर्स.
  • पॉवर इलेक्ट्रॉनिक्स (Power Electronics): रेक्टिफायर्स, इनव्हर्टर्स, चॉपर्स आणि स्पीड कंट्रोल मेकॅनिझम.

ब)सामान्य क्षमता चाचणी (General Ability Test)

  • इंग्रजी भाषा (General English): व्याकरण (Grammar), शब्दसंग्रह (Vocabulary), उताऱ्यावरील प्रश्न (Comprehension) आणि वाक्यरचना.
  • सामान्य ज्ञान (General Knowledge): चालू घडामोडी (राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय), भारतीय इतिहास, भारताचा भूगोल आणि सामान्य विज्ञान.
  • दूरसंचार क्षेत्राची माहिती (Telecom Awareness): भारतातील दूरसंचार क्षेत्राचा इतिहास, नवीन तंत्रज्ञान (5G इ.) आणि घडामोडी.

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 03 जुलै 2026

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अनुभव याबाबतचा तपशील पूर्ण आहे का याची खात्री करावी.
  • सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
  • सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
  • अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक 03 जुलै 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

हे पण वाचा : 🌟 BPCL Bharti 2026: भारत पेट्रोलियम मध्ये करिअर करण्याची उत्तम संधी; जाणून घ्या सविस्तर अभ्यासक्रम !

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo