SSC CHSL Bharti 2026 : 12वी पाससाठी केंद्र सरकारमध्ये मोठी भरती, येथे अर्ज करा.

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
SSC CHSL Bharti 2026

SSC CHSL Bharti 2026 : कर्मचारी निवड आयोग (SSC) कडून दरवर्षी घेतली जाणारी संयुक्त उच्च माध्यमिक स्तर (CHSL) परीक्षा ही देशातील सर्वात लोकप्रिय स्पर्धा परीक्षांपैकी एक आहे. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये, विभाग आणि कार्यालयांमध्ये कनिष्ठ लिपिक, सहाय्यक आणि डेटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाते.

बारावी उत्तीर्ण झालेले लाखो विद्यार्थी सध्या या परीक्षेच्या अधिसूचनेची वाट पाहत आहेत आणि इंटरनेटवर अर्जाच्या तारखा शोधत आहेत. या लेखामध्ये आपण SSC CHSL Bharti 2026 अंतर्गत उपलब्ध पदे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा स्वरूप आणि अर्ज भरण्याची नेमकी पद्धत सविस्तर पाहणार आहोत.

SSC CHSL Bharti 2026 : कर्मचारी निवड आयोग (SSC) भरती 2026

Post Date : 08 सप्टेंबर 2026Last Date : 07 ऑक्टोबर 2026

www.marathigurumahajobs.in

SSC CHSL Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन

भरती विभाग : कर्मचारी निवड आयोग (SSC)

एकूण पदसंख्या : 2536 रिक्त जागा

पदांचे नाव :

शैक्षणिक पात्रता : उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून किमान 12वी (10+2) उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. काही विशिष्ट विभागांतील डेटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी 12वी सायन्स (गणित विषयासह) उत्तीर्ण असणे आवश्यक असते.

SSC CHSL Bharti 2026 Links

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय हे दिनांक 01 ऑगस्ट 2026 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 27 वर्षापर्यंत असावे. (SC/ST 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/OBC : ₹100/-रु. (SC/ST/ExSM/महिला : अर्ज शुल्क नाही.)

मासिक वेतन : सदर भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना 63,200/- रुपये इतके आकर्षक मासिक वेतन वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 07 ऑक्टोबर 2026 (11:00 PM)

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

SSC CHSL Bharti 2026 Selection Process : निवड प्रक्रिया

SSC CHSL Bharti 2026 अंतर्गत निवड प्रक्रिया दोन प्रमुख टप्प्यांमध्ये विभागलेली आहे:

१. टियर-१ परीक्षा (Tier-I): यामध्ये २०० गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी संगणकीय परीक्षा घेतली जाते, ज्यामध्ये सामान्य बुद्धिमत्ता, इंग्रजी भाषा, परिमाणात्मक कल (गणित) आणि सामान्य ज्ञान या विषयांचा समावेश असतो.
२. टियर-२ परीक्षा (Tier-II): लेखी परीक्षा आणि टायपिंग किंवा डेटा एंट्री स्किल टेस्ट घेतली जाते. गुणवत्ता यादीतील कामगिरीनुसार अंतिम शिफारस केली जाते.

How to Apply (अर्ज कसा करावा?)

या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येईल. अर्ज करताना खालील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील:

  • सर्वप्रथम नव्या पोर्टलवर ‘One Time Registration’ (OTR) पूर्ण करा.
  • खात्यात लॉगिन करून सक्रिय भरती पर्यायांमध्ये जाऊन अर्ज निवडा.
  • वैयक्तिक तपशील, शैक्षणिक पात्रता आणि परीक्षा केंद्र निवडा.
  • नवीन नियमांनुसार पोर्टलवरील थेट वेबकॅमद्वारे थेट फोटो (Live Photo) कॅप्चर करा आणि स्वाक्षरी अपलोड करा.
  • लागू असलेले शुल्क ऑनलाइन भरून अर्जाची पीडीएफ प्रत सेव्ह करून ठेवा.

हे पण वाचा :

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

Leave a Comment