RRB Paramedical Bharti 2026 : जर तुम्ही वैद्यकीय किंवा आरोग्य क्षेत्रात शिक्षण पूर्ण केले असेल आणि भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (RRB) विविध रेल्वे क्षेत्रांमधील रुग्णालयांसाठी पॅरामेडिकल स्टाफच्या रिक्त जागा भरण्याची अधिकृत घोषणा केली आहे. या RRB Paramedical Bharti 2026 अंतर्गत पात्र पुरुष आणि महिला उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.
सध्याच्या आधुनिक रेल्वे आरोग्य सेवांमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा आणि वैद्यकीय उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या कुशल असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे. या लेखामध्ये आपण RRB Paramedical Bharti 2026 ची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, ७ व्या वेतन आयोगानुसार मिळणारे आकर्षक वेतन आणि नव्या संगणकीय परीक्षा पद्धतीबद्दल सोप्या मराठीत सविस्तर माहिती पाहणार आहोत.
RRB Paramedical Bharti 2026 : रेल्वे भरती बोर्ड भरती 2026
| Post Date : 17 सप्टेंबर 2026 | Last Date : 14 ऑक्टोबर 2026 |
RRB Paramedical Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
भरती विभाग : रेल्वे भरती बोर्ड (RRB)
एकूण पदसंख्या : 590 जागा
पदांचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | नर्सिंग सुपरिटेंडेंट | 365 |
| 2 | डायलिसिस टेक्निशियन | 01 |
| 3 | हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड II | 43 |
| 4 | ऑडिओलॉजिस्ट अॅण्ड स्पीच थेरपिस्ट | 01 |
| 5 | फार्मासिस्ट | 118 |
| 6 | रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन | 25 |
| 7 | ECG टेक्निशियन | 04 |
| 8 | ऑप्टोमेट्रिस्ट | 02 |
| 09 | लॅब असिस्टंट ग्रेड II | 31 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1: GNM किंवा B.Sc (Nursing)
- पद क्र.2: (i) B.Sc. (ii) डिप्लोमा (Hemodialysis) किंवा 02 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) B.Sc.(Chemistry) (ii) हेल्थ / सॅनिटरी इंस्पेक्टर डिप्लोमा किंवा NTC (Health Sanitary Inspector)
- पद क्र.4: ऑडिओलॉजी, स्पीच-लँग्वेज पॅथॉलॉजीमधील पदवी (BASLP)
- पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण (ii) D.Pharm
- पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण (ii) डिप्लोमा (Radiography / X Ray Technician / Radio diagnosis Technology)
- पद क्र.7: (i) 12वी उत्तीर्ण /B.Sc (ii) डिप्लोमा/पदवी (ECG Laboratory Technology / Cardiology /Cardiology Technician / Cardiology Techniques)
- पद क्र.8: B.Sc. (Optometry) किंवा ऑप्थॅल्मिक टेक्निशियन डिप्लोमा
- पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण (ii) DMLT
RRB Paramedical Bharti 2026 Links
| संपूर्ण जाहिरात pdf | येथे क्लिक करा |
| Online अर्ज | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 जानेवारी 2027 रोजी 20 वर्ष ते 40 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : GEN/OBC/EWS : ₹500/- रुपये (SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला : ₹250/- रुपये)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 18,000/-रुपये ते 92,300/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 14 ऑक्टोबर 2026 (11:59 PM)
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
- सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
- सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
- अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
हे पण वाचा :
- 🛑 Gramin Dak Sevak GDS Bharti 2026 : परीक्षा नाही, मुलाखत नाही; थेट 10 वीच्या मार्कांवर मिळणार नोकरी!
- 🛑MSRTC Dharashiv Bharti 2026: एसटी महामंडळ धाराशिव विभागात भरती सुरू; येथे करा अर्ज
- 🛑 Pune Mahanagarpalika Bharti 2026 : पुणे महानगरपालिका अंतर्गत आरोग्य पदांची भरती सुरु ! येथे अर्ज करा.
- 🛑 Income Tax Department Vacancy 2026 : आयकर विभाग अंतर्गत नवीन पदांची भरती सुरु ! येथे अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.







