Gramin Dak Sevak GDS Bharti 2026 : भारतीय टपाल विभागाने (India Post) ग्रामीण भागातील टपाल सेवा अधिक बळकट करण्यासाठी अधिकृत पोर्टलवर नवीन भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या आणि ग्रामीण भागात राहून देशसेवेची इच्छा बाळगणाऱ्या तरुणांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. या प्रक्रियेद्वारे देशभरातील विविध पोस्टल सर्कल्समध्ये 25,000+ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला Gramin Dak Sevak GDS Bharti 2026 अंतर्गत जाहीर झालेली पदे, आवश्यक शैक्षणिक पात्रता, निवड पद्धत, वयोमर्यादा आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा, याविषयीची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत देणार आहोत.
Gramin Dak Sevak GDS Bharti 2026 : भारतीय टपाल विभाग (India Post) भरती 2026
| Post Date : 27 ऑगस्ट 2026 | Last Date : 21 सप्टेंबर 2026 |
Gramin Dak Sevak GDS Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
भरती विभाग : भारतीय टपाल विभाग (India Post)
एकूण पदसंख्या : 25,000+ रिक्त जागा
पदांचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | ब्रँच पोस्ट मास्टर (BPM) | – |
| 2 | असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर (ABPM) | – |
| 3 | डाक सेवक (GDS) | – |
| एकूण जागा | 25,000+ |
शैक्षणिक पात्रत : i) 10वी उत्तीर्ण, GDS (ग्रामीण डाक सेवक) पदावरील नियुक्तीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता म्हणजे भारत सरकार, राज्य सरकारे किंवा केंद्रशासित प्रदेशांमधील कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाद्वारे आयोजित १० वीची (Secondary School Examination – SSE) परीक्षा उत्तीर्ण असणे; ज्यामध्ये गणित आणि इंग्रजी या विषयांत उत्तीर्ण गुण मिळवणे अनिवार्य आहे. ii) अर्जदाराने मान्यताप्राप्त मंडळाकडून स्थानिक भाषेचा अभ्यास किमान १० वी इयत्तेपर्यंत केलेला असावा.
Gramin Dak Sevak GDS Bharti 2026 Links
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल ४० वर्षे असावे. सरकारी नियमांनुसार, अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षे, तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना ३ वर्षांची सवलत दिली जाईल.
अर्ज शुल्क :
- खुला प्रवर्ग (General / UR): १००/-₹
- इतर मागासवर्गीय (OBC): १००/-₹
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS): १००/-
- अनुसूचित जाती (SC) / अनुसूचित जमाती (ST): ०/- (पूर्णपणे मोफत)
- दिव्यांग उमेदवार (PwD): ०/- (पूर्णपणे मोफत)
- सर्व महिला उमेदवार (All Female Candidates): ०/- (पूर्णपणे मोफत)
- हे अर्ज शुल्क तुम्हाला नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा युपीआय (UPI) यांसारख्या अधिकृत ऑनलाईन माध्यमांद्वारे भरता येईल. एकदा फी भरल्यानंतर ती कोणत्याही परिस्थितीत परत (Refund) केली जात नाही.
मासिक वेतन : सदर भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना 12,000/- रुपये ते 29,380/- रुपये इतके आकर्षक मासिक वेतन वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 21 सप्टेंबर 2026
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
ऑनलाईन अर्ज कसा करावा?
टपाल विभागाने अधिकृत संकेतस्थळावर (indiapostgdsonline.gov.in) अर्जाची लिंक सक्रिय केली आहे. उमेदवारांनी खालील टप्प्यांचा वापर करून अर्ज करावा:
- प्रथम अधिकृत पोर्टलला भेट देऊन ‘July 2026 Registration’ वर क्लिक करा.
- आपला सक्रिय मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी टाकून ओटीपी (OTP) द्वारे व्हेरिफिकेशन पूर्ण करा.
- प्रोफाइल लॉगिन केल्यानंतर १० वीच्या गुणपत्रिकेप्रमाणे स्वतःचे नाव, आई-वडिलांचे नाव आणि गुणांची अचूक नोंद करा.
- स्कॅन केलेला पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी योग्य केबी (KB) साईजमध्ये अपलोड करा.
- आपल्या सोयीनुसार जिल्ह्याचे (Division) पर्याय निवडा आणि ऑनलाईन ₹१००/- फी भरून फॉर्म अंतिम सबमिट करा (महिला आणि राखीव प्रवर्गासाठी फी पूर्णपणे माफ आहे).
हे पण वाचा :
- 🛑 मोठी भरती ! भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) अंतर्गत तब्बल 4098 जागांची भरती सुरु ! अर्ज कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण माहिती
- IOB LBO Bharti 2026: इंडियन ओव्हरसीज बँकेत लोकल बँक ऑफिसर पदांची मोठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.







